Snapchat हा मित्र व परिवारासोबत एखादा क्षण शेअर करण्याचा जलद आणि मजेशीर मार्ग आहे 👻
Snap
• Snapchat थेट कॅमेरा उघडते — फोटो काढण्यासाठी फक्त टॅप करा किंवा व्हिडिओसाठी दाबा आणि धरून ठेवा.
• स्वतःला लेन्सेस, फिल्टर्स, Bitmoji आणि इतर गोष्टींसह व्यक्त करा!
•Snapchat समुदायाने रोज तयार केलेले नवीन लेन्सेस आजमावून पहा!
चॅट
• लाइव्ह मेसेजिंगसह मित्रांच्या संपर्कात रहा किंवा ग्रुप गोष्टींसह तुमच्या दिवसातील घडामोडी शेअर करा.
• एकाच वेळी एकूण १६ मित्रांपर्यंत व्हिडिओ चॅट करा — तुम्ही चॅट करताना लेन्सेस आणि फिल्टर्सदेखील वापरू शकता!
• Friendmoji सह स्वतःला व्यक्त करा — हे फक्त तुमच्या व तुमच्या मित्रासाठी तयार केलेले खास Bitmoji आहे.
गोष्टी
• मित्रांच्या दिवसातील घडामोडी पाहण्यासाठी त्यांच्या गोष्टी पहा.
• तुमच्या आवडींच्या आधारावर Snapchat समुदायाच्या गोष्टी पहा.
• ठळक बातम्या आणि विशेष ओरिजिनल शो शोधा.
स्पॉटलाइट
• स्पॉटलाइट वर Snapchat चा सर्वोत्तम आशय असतो!
• तुमचे स्वतःचे Snaps सादर करा किंवा आरामात बसा आणि पहा.
• तुमचे आवडते निवडा आणि ते मित्रांसोबत शेअर करा.
मॅप
• तुमचे स्थान तुमच्या जीवलग मित्रांसह शेअर करा किंवा घोस्ट मोडसह गायब व्हा.
• तुमचे मित्र त्यांचे स्थान तुमच्यासोबत शेअर करतात तेव्हा तुमच्या सर्वात वैयक्तिक मॅपवर ते काय करत आहेत हे पहा.
• जवळील किंवा जगभरातील समुदायाच्या लाइव्ह गोष्टी एक्स्प्लोर करा!
मेमरीझ
• तुमच्या सर्व आवडत्या क्षणांचे अमर्यादित फोटो आणि व्हिडिओ सेव्ह करा.
• जुन्या क्षणांमध्ये बदल करा आणि ते मित्रांना पाठवा किंवा तुमच्या कॅमेरा रोलमध्ये ते सेव्ह करा.
• मित्र व परिवारासोबत शेअर करण्यासाठी तुमच्या आवडत्या मेमरीझमधून गोष्टी तयार करा.
मैत्री प्रोफाइल
• तुम्ही एकत्र सेव्ह केलेले क्षण पाहण्यासाठी प्रत्येक मैत्रीची स्वत:ची खास प्रोफाइल असते.
• नजराण्यांसह तुमच्यात समान असलेल्या गोष्टी शोधून काढा — तुम्ही किती काळापासून मित्र आहात, तुमची फलज्योतिषानुसारची सुसंगतता, तुमचा Bitmoji फॅशन सेन्स, आणि बरेच काही पहा!
• मैत्री प्रोफाइल फक्त तुमच्यात आणि एका मित्रात तयार होतात, ज्यामुळे तुमची मैत्री कशामुळे खास होते यावरून तुम्ही आणखी जवळ येऊ शकता.
हॅपी स्नॅपिंग!
कृपया नोंद घ्या: स्नॅपचॅटर नेहमी तुमचे मेसेज स्क्रीनशॉट घेऊन, कॅमेरा वापरून किंवा इतर प्रकारे कॅप्चर किंवा सेव्ह करू शकतात. सांभाळून Snap करा!
आमच्या गोपनीयता पद्धतींच्या संपूर्ण विवरणासाठी, कृपया आमचे गोपनीयता केंद्र पहा.